भाषांतर क्षेत्रातील संधी आणि आमचा ह्या क्षेत्रातील नवीन मार्गदर्शक कोर्स


मी भाषांतराला सुरुवात केली तेव्हा ते अगदी वैयक्तिक स्वरुपात होते. पण सुरुवात केली तीच् मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या कामाने. किर्लोस्कर ओईल इंजिन्स, बजाज ऑटो, टेल्को, फिनोलेक्स अशा कंपन्यांचं काम करताना खूप धडपड करून तांत्रिक शब्दांचे अर्थ शोधून मग पूर्ण झालेलं काम ते देणाऱ्या ऑफिसरना दाखवून त्यांनी समाधान झाल्याचे सांगितल्यावर ते काम त्यांना सुपूर्त करायचं. पैसे पण लगेच् मिळतील अशी खात्री नसायची.


ग्लोबलायझेशन अँड लोकलायझेशन असोसिएशन (GALA) च्या माहितीनुसार २०१६ मध्ये भाषा क्षेत्रातील उद्योगाची व्याप्ती साधारण ४० अब्ज डॉलर (USD) इतकी होती, आणि ती २०२० मध्ये ४५ अब्ज डॉलर पर्यंत पोचेल असा अंदाज आहे. आता भाषांतराची मोठी थोरली इंडस्ट्रीच् झाली आहे. हल्ली कामासाठी सोयी पण बऱ्याच् आहेत. संगणक, आंतरजाल, मोबाईल या साऱ्यांनी तर एकूण उद्योगजगताचे रूपच् बदलून टाकले आहे. घराच्या काय खोलीच्या सुद्धा बाहेर न पडता बसल्या जागेवरून तुम्ही कधीही काम करू शकता. पुण्यातल्या, भारतातल्या इतकेच् नाही तर जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या कोणाचीही कामे करू शकता, त्यांना बिल पाठवू शकता, पैसे सुद्धा थेट तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होतात. आपल्या इतर जबाबदाऱ्या सांभाळून ज्या प्रोफेशनल्सना लोकेशन-फ्री काम करायची इच्छा आहे अशांसाठी भाषा क्षेत्रातील संधी आकर्षक ठरतील.


त्यासाठी लॅपटॉप सहित अन्य मूलभूत ज्ञानाची गरज असते जसे की


  • दोन भाषा हे अर्थातच् पुरेसं नसतं.
  • त्या त्या विषयाची महिती.
  • त्या संदर्भात वापरले जाणारे शब्द आत्मसात करावे लागतात.
  • आणि या कामासाठी अत्यंत चिकाटी आणि संयम जरुरीचा असतो.

एका जागी बैठक मारून निरनिराळे शब्दकोष संदर्भासाठी वापरून एकाग्र मनाने तपश्चर्या केल्याप्रमाणे हे काम करावे लागते. जाता जाता वा उडत उडत लक्ष देऊन होणारे हे काम नव्हे. कारण अत्यंत महत्वाच्या विषयांवरची आणि ज्यावाचून अडेल अशीच्कामे आपल्याकडे तरी सध्या येतात.


कायद्याची, वैद्यकीय विषयांवरची, तंत्रज्ञानाची, किंवा तत्सम महत्वाची कागदपत्रे भाषांतराला येतात. त्यात एका शब्दाचीही किवा अर्धविराम पूर्णविरामाची सुद्धा चूक होऊन चालत नाही. एका भाषेत समजलेला अर्थ संपूर्णपणे योग्य तऱ्हेने दुसऱ्या भाषेत पोचवायचा म्हणजे थोडक्यात सांगायचं तर दुसऱ्याच्या बाळाला रडू न देता सुखरूप घरी पोचवायचं !


शिवाय महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे भारतात सर्व साधारणपणे २-३ भाषा सहज येत असतात बऱ्याच् जणांना एक म्हणजे मातृभाषा, दुसरी इंग्रजी आणि तिसरी हिंदी. याव्यतिरिक्त शेजारच्या एक दोन राज्यांतील भाषा थोड्या तरी समजतात आणि थोड्याफार बोलताही येतात. यामुळे आणखी एखादी आंतरराष्ट्रीय भाषा शिकणं थोड्याशा परिश्रमाने सहज शक्य होतं. संस्कृत स्तोत्र वगैरे पाठांतर लहानपणीच् केल्याचा फायदा मिळतो तो म्हणजे कुठल्याही भाषेतला कुठल्याही उच्चार अगदी बरोबर जमतो. एकाशी बोलत असताना इतरांच्या प्रतिक्रियांवर लक्ष ठेवण्याची हातोटीहि लागते. त्यामुळे सर्वांच्या बोलण्यात दुभाषी सुसूत्रता ठेवू शकतात. ज्यांना एकाजागी बसून भाषांतराचं काम जमत नाही वा आवडत नाही त्यांना ही दुभाषाची भटकंतीची, चार जणात काम करायची संधी नक्कीच् आवडेल. ही संधी स्त्रियांना त्याच् प्रमाणे पुरुषांना सोडाविशी वाटणार नाही.

आजकालच्या तरुणांना एका ठराविक वेळेला एकाच् जागी रोज एका क्युबिकल मधे बसून काम करण्यापेक्षा त्यांच्या सोयीनुसार जगात कुठेही बसून काम करण्याची मुभा देणारा व्यवसाय अधिक आकर्षक ठरेल. भाषांतराचे काम आता नेटवरूनही मिळू शकते. अर्थात त्यासाठी विषयाची सखोल माहिती आणि दोन्ही भाषांवर प्रभुत्व असणे अत्यावश्यक आहे. सध्या जागतिक स्तरावर विचार केल्यास या दोन भाषांपैकी एक मातृभाषा असणे आवश्यक असते. मातृभाषेचे ज्ञान वादातीतच् असते. स्वतःचे विचार मांडण्याचे उत्तम माध्यम मातृभाषाचे असते. त्यामुळे ज्या भाषेतून भाषांतर करायचे ती म्हणजे सोर्स लँग्वेज. मातृभाषा नसली तरी चालते, परंतु ज्या भाषेत भाषांतर करायचे ती भाषा म्हणजे टार्गेट लँग्वेज मातृभाषाचे असणं गरजेचं असतं. भारतीयांना मात्र ही अट शिथील करून मिळते. इंग्लिश आपल्या अंगात मातृभाषेसारखी मुरलेली असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवसाय करताना आपल्याला इतर भाषातून इंग्लिशमध्ये भाषांतराची संधी असते किंवा आज-काल इ-शाँपिंग वा इ-गव्हर्नन्स साठी इंग्रजी मधून भारतातील भाषा असे काम पण बरेच् असते. भारतीय भाषांना अखेर त्यांचे महत्व मिळायला लागले आहे, पण ह्या भाषांवर उत्तम प्रभुत्व असलेले व व्यवस्थित लिहू शकणारे लोक हातावर मोजण्याइतकेच् आहेत अजून.


आणि हे सर्व लिहिण्याचे कारण एकच् की पुढच्या पिढीतल्या भाषाप्रेमींना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून कसे छान काम सुरु करता येईल ते कळावे. ह्या कामाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच् जाणार आहे हे निश्चित ! नोकरीच्या संधी तर खूप च् वाढत आहेत. पण बिन भांडवलाचा व्यवसाय म्हणूनही याची जागा महत्वाची आहेच् . माझ्या या वाटचालीचा, ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग या वाटेने येणाऱ्यांना व्हावा अशी माझी इच्छा आहे.


ह्याच् उद्देशाने आम्ही भाषांतर क्षेत्रातील मार्गदर्शक असा कोर्स सुरु करीत आहोत. अधिक माहितीसाठी आमच्या खालील ई-मेल पत्त्यावर चौकशी करा किंवा आम्हाला फोन करा


- माधुरी दातार, संस्थापक, लँग्वेज सर्व्हिसेस ब्युरो माधुरी दातार ह्या लँग्वेज सर्व्हिसेस ब्युरो ह्या भाषा कंपनीच्या संस्थापक आहेत. १९७९ साली त्यांनी ही कंपनी चालू केली. त्यावेळी भारतात अन्य कुठेही अशा प्रकारचा व्यवसाय नव्हता.


फ्रेंच भाषेत MA करून त्या आधी मुंबई CID मध्ये नोकरीला होत्या. त्यानंतर त्यांनी किर्लोस्कर कन्सलटन्टमध्ये एक भाषा विभाग स्थापन केला जिथे त्या विविध भाषेंमध्ये काम करू लागल्या. एखादे काम आले आणि ती भाषा येत नसेल तर त्या आधी ती भाषा शिकून घ्येयच्या आणि मग ते काम करून द्येयच्या !!

गेल्या जवळ जवळ ४० वर्षांमध्ये त्या २७ भाषा शिकल्या आहेत, आणि त्यातील साधारण १२ भाषा त्या शिकवतात.

वरील उल्लेख केलेल्या भाषांतर क्षेत्रातील मार्गदर्शक कोर्स मध्ये त्या स्वतः शिकवणार आहेत. ह्या संधीचा सर्व भाषा प्रेमींनी उपयोग करून घ्यावा !

आजच् आमच्या खालील ई-मेल पत्त्यावर चौकशी करा किंवा आम्हाला फोन करा !

Want to know more?

Get in touch with us today!

Contact Us