लँग्वेज सर्विसेस ब्युरो च्या व्यवसायिक कारकीर्दीची ४० वर्षे

३० सप्टेंबर २०१८ रोजी, लँग्वेज सर्विसेस ब्युरो’ या संस्थेने त्यांच्या व्यवसायिक कारकीर्दीच्या ४० व्या वर्षांची सुरुवात साजरी केली. ‘आंतरराष्ट्रीय भाषांतर दिना’ च्या निमित्ताने हा कार्यक्रम करण्यात आला. संस्थापक सौ. माधुरी दातार यांनी अनेक अनुभवी तज्ञ भाषांतरकारांसमोर लँग्वेज सर्विसेस ब्युरोच्या कारकीर्दीच्या सुंदर प्रवासाबद्दल त्यांचे मनोगत व्यक्त केले.

“त्या काळचे (पूर्वीचे) आणि आजचे भाषांतर” असा कार्यक्रमाचा विषय होता, ज्यामध्ये भाषांतरकारांनी पॅनेल चर्चेतून भाषांतर करण्याच्या विविध पद्धतींबद्दल आपली मते आणि अनुभव सांगितले.

पॅनेलिस्ट: श्री.विवेक गोखले (जपानी भाषांतरकार), डॉ.चेतन ठाकर (रशियन भाषा तज्ञ ), आणि सौ.माधुरी दातार ( संस्थापक, एल.एस.बी )


एल.एस.बी च्या वतीने अनुभवी भाषांतरकारांचे संत ज्ञानेश्वरांचे स्मृतिचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले. (संत ज्ञानेश्वर हे प्रख्यात भाषांतरकार होते. त्यांनी भगवत् गीतेचे संस्कृत मधून मराठीमध्ये भाषांतर केले आहे [ज्ञानेश्वरी].)

चर्चेसाठी खालील विषय होते :

  • पूर्वीच्या भाषातरांच्या पद्धती
  • साधने
  • संपादन, फॉरमॅटिंग आणि
  • आव्हाने

कार्यक्रमात केवळ विध्यार्थीच नाही तर सहभागी झालेल्या सर्वांना त्याकाळी असणाऱ्या समस्यांबद्दल सखोल माहिती मिळाली.

कार्यक्रमाची सांगता एका प्रेझेंटेशनने करण्यात आली, ज्यामधून त्याकाळी आणि आज होत असणाऱ्या भाषांतराबद्दल थोडक्यात माहिती देण्यात आली. तसेच या प्रेझेंटेशन द्वारा कॅट टूल (कॉम्प्युटर एडेड ट्रान्सलेशन टूल) चे फायदे आणि कागद-पेना पासून संगणकाच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या भाषांतराच्या क्रांतीची झलकही दाखविण्यात आली.

आमच्या उत्साही प्रेक्षकांनी केवळ प्रश्नच विचारले नाहीत तर साहित्यिक भाषांतरापासून ते त्यांचा भाषांतरकार म्हणून असणारा अनुभव, भाषा करियर/ व्यवसायात असणाऱ्या संधी आणि भावी भाषांतरकार व दुभाषी यांना मार्गदर्शनही केले. त्याचप्रमणे भाषांतर व्यवसायात असणाऱ्या विविध पर्यायांबद्दल माहिती दिली.

Want to know more?

Get in touch with us today!

Contact Us