इंटरनेटच्या वाढत्या उपयोगामुळे विशेषत: खेडयापाडयातून वाढणा-या इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे भारतातील सर्व स्थानिक भाषांचे महत्त्व अतिशय वेगाने वाढत आहे. फक्त मराठीच्या बाबतीत बोलायचे झाले तर ७.२ करोड लोक (मराठी माध्यमाचे) आज इंटरनेटचा वापर करीत आहेत. आपल्यासाठी नक्कीच अभिमानास्पद गोष्ट अशी आहे की, सातशे महत्त्वाच्या जागतिक भाषांपैकी पहिल्या वीसात मराठी भाषेने नंबर पटकावलेला आहे. ही झाली मराठीची गोष्ट आणि अशाच बंगाली, तामिळ, तेलगु
भारतात एकूण २२ अधिकृत भाषा आहेत. अर्थातच या सर्व भाषांतून इंटरनेटचा वापरही अत्यंत वेगाने वाढत आहे हे नक्की, तेव्हा ही पार्श्वभूमी लक्षात घेता स्थानिक भाषांचे महत्त्व किती आणि कसे वाढणार आहे यांचा अंदाज येऊ शकतो.
भारतातल्या सर्वाधिक खपाच्या पहिल्या वीस वर्तमानपत्रांपैकी फक्त ३ इंग्लिशमध्ये आहेत. देशात सर्वत्र स्थानिक भाषांतील वर्तमानपत्रांनाच प्राधान्य दिले जाते पण तरीही आपण एक गोष्ट विसरता कामा नये की, गुगल नावाचं सोसाट्याचं वादळ भारताच्याही आकाशाला झाकून टाकायला आलंय. गुगलवरती टाकलेल्या शोधांपैकी एक तृतीयांश शोध हे स्थानिक भाषांमध्ये असतात. आता जो माणूस भारंभार पैसे टाकून महाग मोबाईल विकत घेतो त्याला इतरांना फुकट मिळणारी सर्व माहिती इंग्लीश नीट येत नसल्यामुळे जर मिळू शकत नसेल, तर ती त्याची चूक नव्हे. त्यालासुद्धा ती सर्व माहिती मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे पण ……….. नाही ना मिळत प्रत्येकाला हवी ती माहिती! खरे तर इंटरनेटवर काय काय माहिती उपलब्ध आहे हेच मुळी माहित नसतं-फार विदारक आहे ही परिस्थिती. बोलण्याचा हक्क, लिहिण्याचा हक्क हे आता सर्वांना माहित झाले आहेत पण माहिती मिळण्याचाही हक्क असतो: (आरटीआय) हे आता लोकांना समजायला लागलंय.
६ मे २०१९ रोजी ‘मराठी कॉन्क्लेव्ह’ हा कार्यक्रम ‘फिक्की’, ‘सी डॅक, ‘राज्य मराठी विकाससंस्था’ . संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. त्यात असे निदर्शनास आणून दिले गेले की, भारतात एकूण ७८० भाषा आहेत त्यापैकी १२२ भाषा कमीत कमी १०,००० लोक तरी बोलतात आणि अधिकृत कार्यालयीन भाषा २२ आहेत. बोली भाषा ६,००० च्या आसपास आहेत. इतका भाषासमृद्ध देश फक्त भारतच् असावा. या एवढया प्रचंड भाषा विश्वाला नाकारून कोणतीच जागतिक कंपनी आपले उद्दिष्ट गाठून प्रगती करू शकणार नाही.
इंटरनेटमुळे पुढे येणा-या नवनवीन गोष्टी वापरायला प्रत्येकाला आवडते. सरकारी कार्यालयातसुद्धा या सर्वांचा चंचुप्रवेश झाला आहे. ‘सी डॅक’ तर्फे रेल्वेच्या आरक्षणांसाठी तसेच लॅण्ड रेकॉर्ड्ससाठी ‘स्वतंत्र कार्यपद्धती’ तयार केल्या आहेत. तसेच बॅंकिंग व इतर क्षेत्रांसाठी काही शोध माध्यमे तयार केली आहेत. त्यात सरकारी साईट्ससुद्धा आहेत. ‘क्रॉस लिंग्वल सर्चेस’ ‘ऑटो सजेशन्स’, चित्रांकन, १२ ओसीआरएस मोबाईल अँड ब्रॉडकास्ट इनबेलमेंट, इंडियन लॅंग्वेजेस टू प्रिंटर्स या सर्व क्षेत्रात इंटरनेटने चांगलेच पाय रोवले आहेत. राज्य मराठी विकास संस्थेच्या प्रयत्नांमुळे मराठी विश्वकोषाचे वीस खंड इंटरनेटवर आता उपलब्ध आहेत. याचा परिणाम मशीन ट्रान्सलेशन तसेच टीटीएस म्हणजेच टेक्स्ट टू स्पीच यावरही दिसून येतो आणि त्यामुळेच स्थानिक भाषांनाही फक्त लोकलायझेशनच्या डबक्यातून बाहेर पडून जागतिकीकरणाकडे वळायला पाहिजे; अर्थात स्थानिक भाषांचे महत्त्व वाढतच जाणार आहे. पुण्यातील ‘सीओईपी’ या प्रसिद्ध इंजीनियरींग कॉलेजमध्ये सुद्धा स्थानिक भाषांतून लेखनासाठी पाठिंबा दिला जात असून त्यासाठी काही खास सवलती किंवा बक्षीसे देण्यात येत आहेत. नागरिकांना पुरविण्यात येणा-य़ा सेवा सुद्धा स्थानिक भाषांतूनच देण्याची व्यवस्था हळूहळू केली पाहिजे म्हणजेच् भाषाशिक्षण हे नोकरी अथवा स्वतंत्र काम मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास आहे.
यांसाठी शिक्षणात आमूलाग्र बदल करणे हे सरकारच्याच अखत्यारित आहे. भाषाशास्त्राच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी निरनिराळया शिष्यवृत्या दिल्या पाहिजेत. इंटरनेटच्या वापरासाठी भाषानिधी (लॅंग्वेज कॉर्पस) तयार केला पाहिजे. नवेनवे जास्त उपयुक्त फॉन्ट तयार केले पाहिजेत. फोटोशॉप . ला पर्याय शोधले पाहिजेत. मराठी डोमेन नेम फक्त ४०० रूपयांमध्ये तयार करून मिळते ते मराठी भाषिकांनी तरी निदान वापरले पाहिजे! मराठी जनतेपैकी फक्त ३.६% जनता इंग्रजी बोलते. त्यामुळे इंटरनेटवर मराठीच्या वापराकडे वळताना अर्थातच अडचणी आणि आव्हाने यांना सतत सामोरे जावे लागणार पण म्हणूनच भारताचे एक विशेष स्थान आहे. लवकरच ४०० मिलियन नवे इंटरनेट वापरकर्ते वाट बघत असतील.
इंटरनेट ४ जी तर भाषेच्या सर्व हद्दी पार करून गेला आहे. आपण जर एखादयाशी त्याची मातृभाषा सोडून इतर भाषेत बोललो तर त्याला समजते म्हणजेच त्याच्या डोक्यात पोहचते पण आपण जर त्याच्याशी त्याच्या मातृभाषेतच बोललो तर त्याच्या डोक्याबरोबर हृदयापर्यंत पोहचते. – इती नेल्सन मंडेला. त्यालाच “इमोशनल कनेक्ट” असे म्हणतात. या व्यतिरिक्त दिव्यांग लोकांनाही वापरता येतील अशा वेबसाईट्स करायला हव्यात कारण असे म्हणतात की जे सापडू शकते त्याचीच किंमत पैशात होऊ शकते. “मॉनटॅबिलिटी डिपेंड्स ऑन सर्चेबिलीटी”.
आजच् आमच्या खालील ई-मेल पत्त्यावर चौकशी करा किंवा आम्हाला फोन करा: info@languageservicesbureau.com
Telephone: +91-20-24470509, +91-82370 60559
Similar articles for you...
आमच्या गेल्या महिन्यातील ब्लॉग मध्ये भाषांचे ज्ञान आवश्यक असणाऱ्या करियर क्षेत्रांची माहिती आपल्याला मिळाली. जिथे भाषेचे ज्ञान फायद्याचे ठरते असे इतर व्यवसाय आपण या महिन्यात पाहुयात.
Posted by : Language Services Bureau
तुम्ही कोणत्या ही क्षेत्रात काम करीत असलात तरी विविध भाषांचे ज्ञान अवगत असणे, हे एक महत्वाचे कौशल्य आहे. जागतिकी करण, आंतरराष्ट्रीय व्यापार उद्दमा मध्ये झपाट्याने झालेली वाढ, इंटरनेट व त्याची व्याप्ती यांमुळे नोकरीसाठी उमेदवारांची निवड करताना उमेदवाराला एखादी परकीय भाषा अवगत असेल तर त्याला निश्चितच प्राधान्य मिळते.