तुम्ही कोणत्या ही क्षेत्रात काम करीत असलात तरी विविध भाषांचे ज्ञान अवगत असणे, हे एक महत्वाचे कौशल्य आहे. जागतिकी करण, आंतरराष्ट्रीय व्यापार उद्दमा मध्ये झपाट्याने झालेली वाढ, इंटरनेट व त्याची व्याप्ती यांमुळे नोकरीसाठी उमेदवारांची निवड करताना उमेदवाराला एखादी परकीय भाषा अवगत असेल तर त्याला निश्चितच प्राधान्य मिळते.
मुळातच भारतीय लोक बहुभाषिक असतात. साधारण पणे ते त्यांची मातृभाषा (प्रांतिकभाषा), हिंदी (जिला राष्ट्रीय भाषा मानले जाते, जरी भारतीय संविधाना नुसार सर्व भारतीय भाषांना समान दर्जा असला तरी), आणि इंग्रजी (जी शाळेत शिकविली जाते) या तीन भाषा नक्कीच बोलू शकतात. आज काल बहुतांश शाळांमध्ये सुमारे १३ ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना फ्रेंच,जर्मन, स्पॅनिश, आणि आता तर मैंडरीन (चायनीज) सारख्या परकीय भाषा शिकविण्यास सुरुवात केली जाते. त्यामुळे कोणत्या ही भारतीय व्यक्तीला नवी भाषा शिकणे एखाद्या एक भाषीय व्यक्ती इतके नक्कीच अवघड जात नाही!
भाषा शिकण्याने भाषेशी निगडित क्षेत्रामध्ये नोकरीच्या व व्यवसायाच्या नाना विधसंधी उपलब्ध होतात आणि करिअरच्या कक्षा रुंदावतात. त्यातील काही खाली दिल्या आहेत.
भाषांतर –यामध्ये एक भाषेतील सामग्री चाम तितार्थ दुसऱ्या भाषेत मांडला जातो.
अ) तांत्रिक भाषांतर – यामध्ये खालील प्रकारच्या तांत्रिक कागदपत्रांच्या भाषांतराचा समावेश होतो.
आ) व्यावसायिक भाषांतर – विदेशी कंपन्यांशी व्यवहार करताना खालील प्रकारचे व्यावसायिक भाषांतर आवश्यक असते:
इ) कायदे विषयक दस्त ऐवज – विविध कंपन्यांदरम्यान किंवा निरनिराळ्या देशांच्या सरकारांदरम्यान आणि न्यायालयांमधील काम काजांमध्ये देखील होणाऱ्या व्यवहारांसाठी कायद्याने आवश्यक असणारी सर्व कागद पत्रे, दस्त ऐव जयांचे भाषांतर करणे गरजेचे असते. साधारण पणे खालील कायदे विषयक दस्त ऐव जांचे भाषांतर केले जाते:
ई) शास्त्रीय भाषांतर – नवनवीन शोध, शोध निबंध व पेटंट्स यांचा व्यापक प्रमाणावर प्रसार होण्याच्या उद्देश्याने मूळ भाषेतील सामग्रीचे भाषांतर जगातील प्रमुख भाषांमध्ये करणे गरजेचे असते.
उ) संकेतस्थळांचे भाषांतर – नवनवीन बाजार पेठांमध्ये व्यवसायांची वृद्धी होण्या करिता संकेतस्थळांचे स्थानिकी करण करणे ही पहिली पायरी आहे. ऑनलाईन व्यवहार किंवा संपर्क करताना ग्राहक कोणत्या ही परकीय / प्रांतिक भाषे पेक्षा स्वतःच्या मातृ भाषेला अधिक प्राधान्य देतात, ही सिद्ध वस्तुस्थिती आहे.
विवेचन (म्हणजेच इंटरप्रिटेशन) – याचा साधासरळ अर्थ म्हणजे तोंडी भाषांतर. ह्यासे वा खालील बाबतीत उपयुक्त ठरतात:
अ. सलग किंवा लागोपाठ विवेचन – या मध्ये विवेचक वक्त्याचे मूळ वाक्य किंवा विधान पूर्ण होई पर्यंत थांबतो आणि त्यानंतर त्या वाक्याचे विवेचन करतो.
आ. एक समयी किंवा समांतर विवेचन – येथे विवेचक वक्त्याचे भाषण पूर्ण होई पर्यंतन थांबता ते सुरु असताना त्याच्या सोबतच समांतर पणे मूळभाषेतून अपेक्षित भाषेत विवेचन सादर करीत राहतो. (म्हणजेच अशा ठिकाणी वक्ता व विवेचक समांतर पणे बोलत राहतात – विवेचक श्रवण यंत्रा द्वारे वक्त्याचे भाषण ऐक तो आणि ताबडतो बमाइक वरून विवेचन सादर करतो. आणि श्रोते त्यांच्या कानाला लावलेल्या श्रवण यंत्राद्वारे विवेचकाचे विवेचन ऐकतात. ) मोठ्यासभांमध्ये किंवा संमेलनांमध्ये अशाप्रकारच्या विवेचनाचा वापर केला जातो.
भाषा प्रशिक्षण – ( व्यक्तिगत / सामुदायिक ) – शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, व्यवस्थापन व आंतरराष्ट्रीय व्यापार संस्था, बहुद्देशीय कंपन्या, इत्यादींना विविध भाषां करिता अनुभवी, हुशार व माहितीगार प्रशिक्षकांची नितांत आवश्यकता असते, आणि दिवसें दिवस ही गरज वाढतच आहे.
मजकूर लेखन – (जाहिरातींचा मजकूर, संकेत स्थळे, इत्यादींसाठी) –म्हणजे उत्पादन /संकेतस्थळ /कार्यक्रम इत्यादींचा एखाद्या भाषेतील प्रचारात्म कमजकूर इंटरनेट किंवा जाहिरातीयांसाठी लिहिणे. असे साहित्य अतिशय प्रभावी भाषेत लिहिले जाते. वाचकांवर त्याची छाप पडते, आणि न कळत वाचकाचे मत सकारात्मक होऊन ती वस्तू प्राधान्याने विकत घेण्याकडे वाचकाचा कल झुकतो.
स्थानिकी करण व आंतरराष्ट्रीय करण – (उत्पादने, संकेतस्थळे, खेळ, दृक – श्राव्य निर्मिती इत्यादींचे) – स्थानिकी करण म्हणजे केवळ भाषांतरा पुरते मर्यादितन राहतात्या मध्ये उत्पादन एखाद्या संस्कृतीशी मिळते जुळते करण्याच्या हेतूने, उत्पादनाची माहिती, व्यावसायिकइ-साहित्य, यांचा कायापालट केला जातो. यातून अशा कंपनीची स्थानिक वापर कर्त्याशी बांधिलकी निर्माण होते. उदा. ठराविक सांकेतिक खुणा किंवा रंगयांचा वापर काही ठिकाणी निषिद्ध मानला जातो. स्थानिकी करणामुळे अशा गोष्टी संवेदन शील पद्धतीने हाताळता येतात. तसेच उत्पादने, सेवा, संकेतस्थळे आणि इतर मजकुराचे आंतरराष्ट्रीय करण करताना ते विविध भाषांमध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत या गोष्टींची व्याप्ती वाढून त्यांचा प्रसार विस्तृत प्रमाणावर होतो.
तांत्रिक लेखन – तांत्रिक लेखन म्हणजे संगणकाचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर, अभियांत्रि की, रसायन शास्त्र, विमान संचार शास्त्र, यंत्र मानव शास्त्र (म्हणजेच रोबोटिक्स), वित्त, वैद्यकीय, ग्राहको पयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू, व जैव तंत्रज्ञान अशा विविध तांत्रिक वव्यावसायिक क्षेत्रांमध्ये उपयुक्त ठरणाऱ्या तांत्रिक पत्र व्यवहाराचे, साहित्याचे लेखन करणे किंवा त्याचा मसुदा तयार करणे. दर्जेदार व सुगम तांत्रिक लेखनासाठी भाषे वरील प्रभुत्वा सोबतच प्रस्तुत क्षेत्राचे सखोल ज्ञान किंवा निदान पुरेसा अभ्यास असणे खूप महत्वाचे व निर्णायक ठरते.
ब्लॉग लेखन – ब्लॉगिंगचा सोप्या भाषेतील अर्थ म्हणजे इंटरनेट वर, ऑनलाईन स्वरूपात तुम्ही स्वतःला व्यक्त करणे आणि संभाव्य वाचक वर्ग किंवा ग्राहक वर्गयांच्या पर्यंत तुमचे म्हणणे पोहोचविणे. बहुतांश उद्योजकांना ब्लॉग्ज लिहायला पुरेसा वेळ नसतो. म्हणून ते लिखाणाचे काम आऊट सोर्स करतात– म्हणजेच इतर व्यक्तीस लिहावयास देतात. पाकक ला ब्लॉग्ज, पर्यटन ब्लॉग्ज, मोटार सायकली, मोबाईल इत्यादीं सारख्याउत्पादनांचे तांत्रिक ब्लॉग्ज, असानाना विविध क्षेत्रांमध्ये ब्लॉग्ज लिहिले जातात. ब्लॉग्जमुळे शोध इंजिन अनुकूलन (म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन / एस. ई. ओ.) उपक्रम, समुदाय निर्मिती करणे, नवीन संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचणे यासाठी कंपन्यांना मदत होते.
मल्टिमीडिया (ध्वनिमुद्रण, उपशीर्षके देणे, व्हॉइस ओव्हर म्हणजेच एखाद्यास उसना आवाज देणे )– तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे मल्टिमीडिया साहित्या मध्ये झपाट्याने वाढ होत आहे. लेखन क्षेत्रा पेक्षा ते अधिक लोक प्रिय माध्यम आहे आणि म्हणूनच त्याच्या स्थानिकी करणाची गरज वाढत आहे:
प्रतिलेखन (म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन) – म्हणजे एखादी ध्वनि फीत किंवा चित्र फीत पाहून त्यातील मजकूर लिखित स्वरूपात उतरविण्याचे तंत्र होय.
ज्यात भाषेचे ज्ञान आवश्यक किंवा फायद्याचे ठरते अशा इतर व्यवसायांचा आढावा आपण पुढच्या महिन्यात घेणार आहोत.
आजच् आमच्या खालील ई-मेल पत्त्यावर चौकशी करा किंवा आम्हाला फोन करा! info@languageservicesbureau.com
Telephone: +91-20-24470509, +91-82370 60559
Similar articles for you...
आमच्या गेल्या महिन्यातील ब्लॉग मध्ये भाषांचे ज्ञान आवश्यक असणाऱ्या करियर क्षेत्रांची माहिती आपल्याला मिळाली. जिथे भाषेचे ज्ञान फायद्याचे ठरते असे इतर व्यवसाय आपण या महिन्यात पाहुयात.
Posted by : Language Services Bureau
तुम्ही कोणत्या ही क्षेत्रात काम करीत असलात तरी विविध भाषांचे ज्ञान अवगत असणे, हे एक महत्वाचे कौशल्य आहे. जागतिकी करण, आंतरराष्ट्रीय व्यापार उद्दमा मध्ये झपाट्याने झालेली वाढ, इंटरनेट व त्याची व्याप्ती यांमुळे नोकरीसाठी उमेदवारांची निवड करताना उमेदवाराला एखादी परकीय भाषा अवगत असेल तर त्याला निश्चितच प्राधान्य मिळते.