आमच्या गेल्या महिन्यातील ब्लॉग मध्ये भाषांचे ज्ञान आवश्यक असणाऱ्या करियर क्षेत्रांची माहिती आपल्याला मिळाली. जिथे भाषेचे ज्ञान फायद्याचे ठरते असे इतर व्यवसाय आपण या महिन्यात पाहुयात.
डीटीपी म्हणजे डेस्कटॉप प्रकाशन – डेस्कटॉप प्रकाशक संगणक सॉफ्टवेअरचा वापर करून छापील किंवा ऑनलाईन प्रकाशित होणारी वर्तमानपत्रे, पुस्तके, माहितीपुस्तिका, आणि इतर साहित्याची पृष्ठरचना करतात. जेव्हा एखादा मजकूर द्विभाषीय किंवा बहुभाषीय असतो तेव्हा डीटीपी प्रोग्रामरला इतर भाषांचे सुद्धा ज्ञान असेल तर सोयी चेठरते, नाही तर त्याच्या/तिच्याकडून अनावधानाने काही शब्दात फेरफार होऊ शकतात किंवा संपूर्ण वाक्ये चगाळली जाऊ शकतात! अशा कामाचे ‘प्रूफरिडींग/संपादन’ करण्यासाठी भाषातज्ज्ञांकडे दिले जाते पण जर डीटीपी तंत्रज्ञालाच संबंधित भाषा अवगत असेल तर वेळेची व पैशांची बचत होते!
एस. ई. ओ. म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, अर्थात शोध इंजिन अनुकूलन – सर्च इंजीनने दाखवलेल्या पर्यायांतील पहिल्या काही पर्यायांमध्ये एखादे संकेतस्थळ दिसावेयासाठी जे केले जाते त्या प्रक्रियेला 'एस. ई. ओ.' म्हणतात आणि हेच जेव्हा एखाद्या बहुभाषीय संकेतस्थळासाठी केले जाते तेव्हा त्याला 'बहुभाषीय एस. ई. ओ.' असे म्हणतात. बहुभाषीय एस. ई. ओ. हा डिजिटल मार्केटिंगचा भाग असून त्यामध्ये केवळ भाषा माहित असण्यापलीकडेही बऱ्याच गोष्टी असतात–त्या भाषिकांची संस्कृती, प्रादेशिक लोकांची इंटरनेटवरील वर्तणूक आणि बोलीभाषेत प्रांतानुसार होत जाणारे बदल अशाबाबींची ही जाण असणे आवश्यक असते. याचबरोबर,मजकूर व्यवस्थापन, सामाजिक माध्यमांचे व्यवस्थापन, गूगलजाहिरातींसारखे ‘पेपरक्लिक’ (पी.पी.सी.), ई-कॉमर्स, इत्यादी इतरक्षेत्रेदेखील आहेत. बहुभाषीय एस. ई. ओ. सल्लागाराला ३-४ भाषा येत असणे आणि प्रोग्रामिंग, शोध इंजिन अनुकूलन, सामाजिक माध्यमांचे विपणन व विक्री ही कौशल्ये अवगत असणे आवश्यक आहे.
बीपीओमध्ये काम बिझिनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग म्हणजे थोडक्यात बीपीओ. यामध्ये एखादी व्यापार प्रक्रिया किंवा कामकाजाचे(शक्यतो ग्राहकसेवा, कॉलसेंटर, बँकिंग, यांसारख्या कार्यालयीन प्रक्रिया) उपकंत्राट दिले जाते. या क्षेत्रामध्ये भाषांच्या भाषातज्ज्ञांची ही आवश्यकता हल्ली मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, आणि केवळ परकीय भाषांच्याच नाही तर बंगाली, तमिळ, मल्याळम इत्यादी भारतीय प्रादेशिक भाषांच्या भाषातज्ज्ञांचीही.डेटाएंट्री, व्हॉईसकॉल्स, ध्वनी विरहित प्रक्रिया, व्यवस्थापन, बँकिंग, बिलिंग, चॅटप्रक्रिया इत्यादी निरनिराळ्या कामांसाठी भाषा सहाय्याची गरज असते.
भारतीय पर राष्ट्रसेवा(आई एफ एस) अधिकाऱ्यास त्याची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर एक परकीय भाषा शिकणे अनिवार्य असते. त्यानंतरच ती भाषा ज्या देशाची स्थानिक भाषा आहे तेथे त्याची नेमणूक केली जाते. त्यानंतर त्याला/तिला सेवेमध्ये कार्यरत राहण्यासाठी त्या भाषेत प्राविण्य प्राप्त करून परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते.
फ्रेंच पाकशास्त्राचा इतिहास काही शतके जुना आहे. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रमांमध्ये नेहमी फ्रेंच भाषेचा प्राथमिक अभ्यासक्रम असतो. त्यामध्ये विविध खाद्यपदार्थांची नावे योग्यपणे कशी उच्चारावी हे शिकविले जाते तसेच वाईन,स्पिरिट्स,सिगार इत्यादी बनवायला शिकताना याचा उपयोग होतो.
गेली दोन दशके माहिती तंत्रज्ञान क्षेत्र भारतीयअर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे क्षेत्र ठरले आहे. अलीकडे कडक झालेले अमेरिकेचे व्हिसा निकष आणि बाजार पेठेतील परिस्थिती पाहता इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषा बोलल्या जाणाऱ्या देशांमध्ये आपला व्यापार वाढविणे सॉफ्टवेअर कंपन्यांसाठी अत्यावश्यक बनले आहे. परकीय भाषा बोलता येत असणाऱ्या माहिती तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांची मोठया प्रमाणावर आवश्यकता आहे. हिंदुस्थान टाइम्स मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार अशा उमेदवारांना सुमारे २०% अतिरिक्त मानधनही दिले जाते.दुसऱ्या देशात कार्यान्वित असलेल्या प्रकल्पांचे समन्वय साधताना समन्वयकांना किंवा व्यवस्थापक स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भाषेविषयक कौशल्य आवश्यक आहे. त्याच लेखानुसार, सद्य स्थितीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मागणी असणाऱ्या सर्वोत्तम ३ भाषा आहेत :मँडरीन, जपानीवजर्मन. अर्थात एखादी व्यक्ती ज्या कंपनीमध्ये कामाला आहे, त्यानुसार इतर भाषांमध्ये देखील पुष्कळ वाव आहेच!
जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्या व माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधील व्यवस्थापकीय कर्मचारी वर्गाला मूळ कंपनीची स्थानिक भाषा असलेली परकीय भाषा अवगत असणे आवश्यक असते. खरेतर, आजकाल बहुतांश व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये परकीय भाषेसाठी देखील अतिरिक्त गुणांकन असते!
पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात आधीपासूनच भाषाकौशल्यांवर भर आहे. त्या व्यतिरिक्तआणखी एखादी भारतीय/परकीय भाषा ही अवगत असणे महत्वाचे आहे कारण पत्रकार त्यांच्या प्रकाशनासाठी इतर भाषेतील लेख नियमितपणे भाषांतरित करत असतात. विदेशी बातमीदार बातमी देताना त्यांचे परकीय भाषेतील कौशल्य वापरू शकतात जे त्यांच्यासाठी महत्वाचे ठरते. भाषेवर चांगली पकड असणाऱ्यांसाठी भाषा कौशल्ये खूप उपयोगी ठरतात आणि त्यातून नक्कीच चांगले भविष्य घडू शकते. विविध आंतरराष्ट्रीय भाषांच्या क्रॅश-कोर्ससाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.
आजच् आमच्या खालील ई-मेल पत्त्यावर चौकशी करा किंवा आम्हाला फोन करा! info@languageservicesbureau.com
Telephone: +91-20-24470509, +91-82370 60559
Similar articles for you...
आमच्या गेल्या महिन्यातील ब्लॉग मध्ये भाषांचे ज्ञान आवश्यक असणाऱ्या करियर क्षेत्रांची माहिती आपल्याला मिळाली. जिथे भाषेचे ज्ञान फायद्याचे ठरते असे इतर व्यवसाय आपण या महिन्यात पाहुयात.
Posted by : Language Services Bureau
The time it takes to learn a language depends on what you want to do with it– here is a great article about language learning and the kind of expectations you can set about the time required for the same!