In the current situation worldwide, most countries are under lockdown and doctors, sanitary workers, and other frontline professionals are battling everyday against the havoc caused by the virus. Here is a poem written in Marathi by Madhuri Datar, our founder, regarding the legendary singers of the Mangeshkar family (including Lata Mangeshkar the nightingale of India), which describes how songs sung by them have always helped the Indian and Marathi audience to keep faith and to fight bravely (these songs became very famous during the war time days in yesteryears) and the poem describes that even if they don’t sing much now, their songs have always been a great inspiration to many Indian generations!
त्या मंगेशकरांच्या बाला चैतन्य जागत्या ज्वाला। प्रत्येक संकटाच्या काळी त्या उजळत होत्या उर्मी थकलेल्या क्षीण दृष्टीला त्या दावित होत्या स्वप्नीं उमलत्या कळया अन तारा चमचमत्या अथांग गगनी कविता स्वतंत्रता देवीच्या अन् स्मृति धगधगत्या शौर्याच्या जगलो आम्ही त्या त्या काला चैतन्य जागत्या ज्वाला।। बाल्यावस्था आणि यौवना अस्फुटशा त्या मधुर भावना देणे अमोल त्याच स्वरांनी मनी ठसविले स्मृति चिन्हांनी ठसे स्पष्ट त्या स्वरसाजाचे तरल भाव अन् मधु स्मृतीला चैतन्य जागत्या ज्वाला आज सौम्य ती ज्योत जागते मूक थाप ती पाठीवर देते जरी नव्या गाण्यांना मुकलो तरी स्पष्ट ती हाक अनामिक ऐकू येते त्या हास्यातून मला चला रे चला लढू या चला सर्व दिशांनी नाद ऐकू आला कुणी असो तो पाक शत्रु वा मृत्यू मुखी लोटता कोरोना वाट आता बघतां कशाला एकत्र या अन् झडप घाला उद्युक्त करीत या समराला चैतन्य जागत्या ज्वाला चला रे उठा लढू या चला मनामनातून गात राहती मंगेशकरांच्या बाला त्या धगधगत्या ज्वाला जरी थकल्या आज जरी अंगार फुलविति स्वर जरतारी फक्त स्मृति पूर्वीची अन् कल्पना नव्या पर्वाची नवे विषाणू अन् नव्या लढाया सूर सात पण मार्ग हजारो दाखविती आम्हाला त्या मंगेशकरांच्या बाला चैतन्य जागत्या ज्वाला माधुरी दातार
आजच् आमच्या खालील ई-मेल पत्त्यावर चौकशी करा किंवा आम्हाला फोन करा! info@languageservicesbureau.com
Telephone: +91-20-24470509, +91-82370 60559
Similar articles for you...
आमच्या गेल्या महिन्यातील ब्लॉग मध्ये भाषांचे ज्ञान आवश्यक असणाऱ्या करियर क्षेत्रांची माहिती आपल्याला मिळाली. जिथे भाषेचे ज्ञान फायद्याचे ठरते असे इतर व्यवसाय आपण या महिन्यात पाहुयात.
Posted by : Language Services Bureau
The time it takes to learn a language depends on what you want to do with it– here is a great article about language learning and the kind of expectations you can set about the time required for the same!